न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड येथील शाहूनगर मधील रहिवासी असलेली कु साक्षी मुकुंद लोटके ही एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षात युक्रेन येथील टरनोपिल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी येथे शिकत असून ती युक्रेन मध्येच राहते तिच्या सुटकेसाठी भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जय शंकर आणि युक्रेनमधील भारतीय दूतावासातील अधिकारी संजय रावत यांच्याशी फोनवरून संपर्क केला आहे.
त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही परराष्ट्र मंत्रालयात या मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न केले असून खुद्द फडणवीस यांनीही तिच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयात बोलणी केलेली आहेत. तिचे वडील मुकुंद लोटके हे टेल्को कंपनीमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत तर आई आई गृहिणी आहे. त्यांनी मुलीच्या सुटकेसाठी भरपूर प्रयत्न चालू केले असून तिच्यासोबत भारतातील आणखी अकरा जणांचा गट आहे.
अमित गोरखे यांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिने भयावह परिस्थिती सांगितली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले असता बस मधून उतरल्यावर सैन्याने माणसे पुढे येऊ नयेत म्हणून श्वान अंगावर सोडल्याचे सांगितले घाबरून त्यांनी पुन्हा बसमध्ये बसवले. बस कुठे चालली माहिती न्हवते, पुन्हा त्यांना बसने त्यांच्या कॉलेजच्या ग्राउंड फ्लोअर ला डंपर मध्ये आणून बसवले. तदनंतर गेले दोन दिवस बिस्कीट आणि ब्रेड यावरच त्यांची गुजराण चालू आहे. मात्र तेथून आज किंवा उद्या हंगेरिला त्यांना हलवण्यात येईल असे भारतीय दूतावासाने कळविले आहे, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली आहे.












