- लिलावात या वाहनांचा असेल समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२२) :- मोशी – प्राधिकरण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या एकूण ३२ वाहनांचा जाहीर ई – लिलाव बुधवारी (दि. ९) सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत करण्यात येणार आहे.
या लिलावात बस, ट्रक, व्हॅन, टुरिस्ट टॅक्सि, रिक्षा व जेसीबीही वाहने असून, मंगळवारपर्यंत परिवहन कार्यालयाच्या आवारात कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध आहेत. ई – लिलावाच्या तारखेपर्यंत वाहनचालक, मालक आणि वित्तदात्यांना वाहन कर भरण्याची संधी राहील, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
ई – लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सूचना फलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे. लिलावात सहभाग नोंदविण्यासाठी २ ते ६ मार्चपर्यंत www.eauction.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइनद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.












