न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळ आयोजित विध्यार्थीनींसाठी ‘निर्भय कन्या योजना’ अंतर्गत व्याख्यान आणि स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.
या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, प्रमुख पाहुणे विद्या माने (पोलीस उपनिरीक्षक, दिघी पोलीस स्टेशन), रेखा वाजे (पोलीस कॉन्स्टेबल, दिघी पोलीस स्टेशन), अरीन कर्माकर (कराटे प्रशिक्षक) व प्रा. शाहूराज येवते (विद्यार्थी विकास अधिकारी) यांच्या हस्ते उद्घाटन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेरणा पाटील यांनी केले.
पोलीस उपनिरीक्षक विद्या माने यांनी स्त्रियांचे कायदे, सायबर सेक्युरिटी व संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. स्त्रिया विषयक कायद्या बद्दल आणि वेगवेगळ्या टोल फ्री क्रमांका बद्दल माहिती दिली. तसेच तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक वापर करून फेसबुक, व्हाट्सअप व मोबाईलचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींनो तुम्ही निर्भय बना पण फक्त बोलण्यापुरते निर्भय होऊ नका, विचाराने निर्भय व्हा व कायद्याचा गैरवापर करू नका असा बहुमोल सल्ला त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला.
प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी नवीन आव्हानांना सामोरे जाताना टेक्नोसॉवी पिढीला त्यांच्यामधील सहनशीलता कमी होऊन आक्रमक प्रतिक्रिया देण्याचा वाढता कल व त्याचा होणारा परिणाम विद्यार्थिनींसमोर मांडला. ऑनलाइनच्या जमान्यामध्ये स्क्रीन टाइम कमी करून मानसिक स्थिरता निर्माण करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी छंद जोपासा, वेळेचे व्यवस्थापन करा, गायन व उद्योगावर भर द्या, डायरी लेखनाच्या माध्यमातून भावनांचा निचरा करा तसेच ‘मी माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही’ याची प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विधार्थीनींना शपथ दिली.
मार्गदर्शन श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर ढमाले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. करिष्मा सातपुते तर, आभार प्रा. सोनाली अभंग यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. शाहूराज येवते (विद्यार्थी विकास अधिकारी) यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. छाया जोशी, प्रा. शैला वाळुंज, प्रा. सीमा साळुंखे, प्रा. विकास दिघे, प्रवीण भावे, आनंद मोरे तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली. या उपक्रमाचा समारोप पसायदानाने झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.
















