- तासासाठीचे भाडे असणार इतके…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- पुणे मेट्रोच्या उद्घाटनादिवशीच मेट्रो स्टेशनवर रेंटवर इलेक्ट्रीक स्कूटर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऐच्छिक स्थळापर्यंत पायपीट करण्याची किंवा रिक्षा, कॅबची वाट पाहत बसावे लागणार नाही.
स्टेशनवर उतरताच ही बाईक घ्या आणि ऐच्छिक ठिकाणी जा आणि पुन्हा स्टेशनमध्ये येऊन ती जमा केल्यास त्यासाठी दर मिनिटाला दीड रुपया इतके भाडे लागणार आहे. महा मेट्रो कंपनीने करार केलेल्या श्रीन या संस्थेकडून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक तासासाठी १५० रुपये, चार तासांसाठी २००, सहा तासांसाठी २५०, आठ तासांसाठी ३००, बारा तासांसाठी ३५० तर, २४ तासांसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत.
इ- बाईक तुम्ही दिवसभरासाठी रेंटवर घेतली आणि मध्येच चार्जिंग संपले तर दोन पर्याय आहेत, त्यातील पहिला पर्याय म्हणजे ती तुम्ही स्वतः घरी, कार्यालयात आदी ठिकाणी चार्ज करणे त्यासाठीचे वायर्स प्लग हे गाडीच्या डिक्कीतच मिळू शकते.
















