न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२२) :- सोमनाथदादा तापकीर युवा मंच आयोजित “जागतिक महिला दिनानिमित्त ” प्रभाग क्रमांक ३२ मधील नागरिक माता-भगिनीसाठी खेळ रंगला पैठणीचा अर्थात, “न्यू होम मिनिस्टर”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख आकर्षण अश्विनी महांगडे, स्वराज्य रक्षक मालिकेतील राणू आक्का, तसेच वन फोर थ्री या नवीन चित्रपटाची टीम उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३२ मधील हजारो महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच प्रत्येक सहभागी महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
विजेत्या महिलांना टू व्हीलर, टीव्ही, कुलर, फ्रीज, सोन्याची नथ, बिजवे, पैठणी अशा अनेक प्रकारच्या भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पूर्ण वेळ थांबून कार्यक्रमाचा आनंद घेतला. यामध्ये विजेता म्हणून शिल्पा देशमुख, दीपाताई मोटे, हिराबाई पाटील, करुणा उशिरे व मंगल लोणकर यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी नगरसेविका ज्योती भारती, नगरसेवक विनोद नढे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पांचाळ, समाजप्रबोधनकार सुभद्रा मुंडे, देविदास नखाते, सुखदेव खेडकर, दत्तात्रय पवार, राजू शेठ पवार, प्रवीण खरात, शरद मस्के, संजय पगारे, रवी नांगरे, ज्योतिबा कामगार मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी खैरे, प्रकाश अंकुश, दिग्विजय नढे, मच्छिंद्र नढे, जगदीश नढे, नीलेश बेंद्रे, बालाजी पांचाळ, सोमनाथदादा तापकीर युवा मंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, ओम साई ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आयोजन केले. सूत्रसंचालन रमेश परळीकर यांनी केले, आभार सोमनाथदादा तापकीर यांनी केले.


















