न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे म्हणून आक्रमक झाला आहे. त्यासाठी मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. टीसचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत केंद्राला शिफारस करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र, सरकारने आपले आश्वासन पाळले नाही.
त्याच्या निषेधार्थ रविवार (दि.१७) रोजी सायं. ४.३० वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज गुरुवार (दि. १४) रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर उपस्थित जनसमुदायास संबोधित करणार आहेत. तरी सर्व समाजबांधवांनी आपल्या हक्काच्या लढ्यासाठी या सभेत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.











