- भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडीला बसणार आळा; निगडी चौक घेणार मोकळा श्वास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) :- पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि चाकण तसेच मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे निगडीतील पवळे उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवकांच्या मागणीनंतर उड्डापुलाखाली भुयारी मार्ग करण्यास महापालिकेने मंजुरी दिली. या कामाचे आज निगडी ‘पीएमटी’ बस स्टॉपच्या जवळ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. प्रभाग १३ आणि १५ मधील सर्व नगरसेवकांनी या अंडरपाससाठी पाठपुरावा केला असून यामुळे निगडीतील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

निगडी येथील भुयारी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमांत नगरसेवक सचिन चिखले, सुमन पवळे, उत्तम केंदळे, कमल घोलप, राजू मिसाळ, अमित गावडे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक बबन शिवणेकर, कासार मामा, उत्तम ढाणे, मदनलाल जैन, फकीर गोलंदाज, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम काळभोर, समीर जावळकर, किशोर गाथाडे, बाळा दानवले, जयनाथ नेटके, निलेश शिंदे, सचिन बनसोडे, सुनील तेलंग, राजू बाबर, सचिन काळभोर, विनायक काळभोर, अनिल गवारे, केशव थोरात, अजय रहातेकर, कपील कदम, विलास चौधरी, अनिल गवारे, सारिका चव्हाण, मेघा काळभोर, प्रभा काळभोर, रंजना काळभोर आदी महिला उपस्थित होत्या. या कामाचा पाठपुरावा खंडोबा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, जयश्री काळभोर, कार्याध्यक्ष बाळा दानवले, सचिन सुदाम काळभोर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मधुकर पवळे उड्डाण पूल बांधण्यात आला. मात्र, शहरातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढल्यामुळे उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चाकण, भोसरीकडून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. तर, प्राधिकरणातून भोसरी, मुंबई व पुणे या बाजुला जाणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक कोंडीमुळे पादचा-यांना रस्ता ओलांडणे कठीण होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी रस्ता ओलांडताना तीनवेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघातामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर उपाय काढण्यासाठी प्रभाग १३ मधील नगरसेवक सचिन चिखले, सुमन पवळे, उत्तम केंदळे, कमल घोलप व १५ मधील नगरसेवक शैलजा मोरे, राजू मिसाळ, अमित गावडे, शर्मिला बाबर यांनी एकत्रीत येऊन उड्डाण पुलाखाली अंडरपास करण्याचा उपाय पालिका प्रशासनाला सूचविला.
मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली अंडरपास केल्यास वाहतूक कोंडीला आळा बसेल. निगडीतील नारिकांसाठी हा अंडरपास किती गरजेचा आहे, हे नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पटवून दिले. त्यावर आयुक्तांनी तातडीने या कामाला मंजुरी दिली. तांत्रीक दृष्ट्या सर्व मंजु-या मिळाळ्यानंतर दोन्ही प्रभागातील नगरसेवकांनी आज अंडरपासचे महापौरांच्या हस्ते भूमीपूजन घेतले. येत्या काही महिन्यांत हा अंडरपास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहे. दोन्ही प्रभागातील आठ नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश आल्याने निगडी प्राधिकरणातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने चांगला पर्याय निर्माण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.












