- बावीस कोटींपेक्षा अधिकच महसूल जमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १२) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी न्यायालायात ४०३ खटले निकाली काढले. त्यामध्ये २ कोटी १९ लाख ६० हजार १६४ रुपये महसूल जमा झाला व आकुर्डी येथील न्यायालयात येथे २६३९ खटले निकाली काढले. त्यामध्ये १९ कोटी ९९ लाख २५ हजार ७६१ रुपये महसूल जमा झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड सुनील कडूसकर होते. यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. काळे, आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी पी.सी. फटाले, एन. टी. भोसले, एस. पी. कुलकर्णी यांचा सत्कार पिंपरी – चिंचवड अॅड. असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. लोकन्यायालय करिता पॅनल अॅडव्होकेट म्हणून अॅड. माधुरी दाते, अँड. सुरेखा थोरात, अँड. वैशाली, अॅड. स्नेहा म्हेत्रे आदींनी काम पाहिले.
अॅडव्होकेटस् बार असोशिएशन अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. अॅड. सूनील कडुसकर, लोक अदालतीच महत्व सांगितले. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाकरिता पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर – पाटील, अॅड. दिनकर बारणे, अॅड. अतिश लांडगे, अॅड. प्रतीक जगताप, अॅड. गोरख कुंभार, अॅड. कुलदीप बकाल, अॅड. रूपाली वाघेरे तसेच वकील, पक्षकार उपस्थित होते.
सूत्रसंचालन बार असोशिएशन सचिव अॅड. निखिल बोडके यांनी तर सहसचिव अॅड. सुनील रानवडे यांनी आभार मानले. नियोजन बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे, उपाध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, सचिव अॅड. निखिल बोडके, महिला सचिव अॅड. प्रियंका सुरवसे, सहसचिव अॅड. सुनील रानवडे, खजिनदार अॅड. अनिल पवार, ऑडिटर अॅड. गोरख मकासरे, सदस्य अॅड. मंगेश खराबे, अॅड. संतोषी काळभोर, अॅड. सारिका मोरे यांनी केले.
















