न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची विद्यमान मुदत दि. १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. महापालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला.
त्यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकपदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्तांची नियुक्ती राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असणारे राजेश पाटील यांनी प्रशासक पदाचा कार्यभार आज दि. १४ मार्च २०२२ रोजी स्विकारला.
















