न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- रावेतमधील जाधवघाट येथील पवनानदी पात्रातील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर आज बुधवारी (दि. १६) रोजी महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ‘ ब ‘ क्षेत्रिय कार्यालयाने संयुक्तिक अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
या कारवाईमध्ये ४ आर.सी.सी. बांधकामे, ११ पत्राशेड व १ वीट बांधकाम असे एकुण अंदाजे ३४४४ चौ.मी अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली. कारवाईसाठी ३ जेसीबी, २ ट्रॅक्टर ब्रेकर, २ बकेट तसेच १५ मजुरांनी सहभाग घेतला.
सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय भोसले, यांच्या नियंत्रणाखाली उप अभियंता दिपक करपे, कनिष्ठ अभियंता मनाली स्वामी, प्रविण धुमाळ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिनेश नेहरकर, अमोल पवार व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच मनपा पोलिस कर्मचारी व रावेत पोलिस स्टेशन ३ पोलीस उपनिरीक्षक, २० पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल २० कर्मचारी यांच्या सहाय्याने करणेत आली.












