- घरांचे दर वाढणार; रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या रेडिरेकनर (बाजार मूल्य) दरानुसार पिंपरी – चिंचवड शहर हद्दीत १२.३६ टक्के दरवाढ झाली आहे. त्यात मेट्रो अधिभार १ एप्रिलपासून लागू झाला आहे.
प्राधिकरण, पिंपळे गुरव, निगडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड या भागातील दर वाढले आहेत, तर चिंचवड, दापोडी, भोसरी, च-होली, तळवडे, मोशी रावेत, मामुर्डी, किवळे, काळेवाडी, रहाटणी या भागातील दर कमी झाले आहेत. जागा व घर खरेदी – विक्रीसाठी हे दर महत्त्वाचे ठरत आहेत.
प्राधिकरण निगडी, पिंपरी, पिंपळे निलख, पिपळे गुरव, हिजवडी, वाकड, इंद्रायणीनगर, संभाजीनगर, शाहूनगर या भागात मोकळ्या निवासी तसेच व्यावसायिक जागेचे दर सर्वात महागले आहेत. एमआयडीसी क्षेत्रातीलही दर वाढले आहेत. पिंपरी चिंचव , भोसरी या तीन एमआयडीसी परिसरातील किमान दर २५ हजार ६३० तर व्यावसायिक इमारतीसाठी ३५ ते ३८ हजार प्रती चौरस मीटर दर आहेत.
देहरोड कॅन्टोन्मेंटमध्ये ४ हजार १२०, एमआयडीसी ब्लॉकमध्ये ३२ हजार, एमआयडीसी चिंचवडमध्ये २५ हजार ६३० तर एमआयडीसी पिपरीमधील भूखंडासाठी ३२ हजार २४० हा दर निश्चित केला आहे. तसेच, एमआयडीसी पिपरी व्यापारी व निवासीसाठी ३७ हजार ४६० व सर्व प्रकारच्या भूखंडासाठी २५ हजार ३३४, प्राधिकरण ना विकास कृषीमध्ये ६ हजार १२० तर ना विकास भागात ५ हजार ३३३ व ६ हजार ७०० पर्यंत दर निश्चित केले आहेत.