न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- भंगाराचे कमिशन मागण्यासाठी फिर्यादी हे त्यांचा भाऊ व मित्रासोबत आरोपी यांच्याकडे गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी तिघांना माराहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
चिंचवड येथील काळभोरनगर येथे गुरूवारी (दि. ७) सायंकाळी ५ वाजता हा प्रसंग घडला. प्रेम महादेव जगताप (वय २८, रा. आनंदनगर, बिगबाजार, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोहित दिवार, इब्बू शेख, शहाबाद शेख (रा. चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.