- भोसरीतील बालाजीनगरमधील घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२२) :- तरुणाला शिवीगाळ करून आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू, सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरीतील बालाजीनगर येथे बुधवारी (दि. १३) दुपारी १२.३० वाजता हा प्रकार घडला.
विनोद सुबराव ताटे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ रविंद्र सुबराव ताटे (वय ३४, रा. भोसरी एमआडीसी) यांनी भोसरी एमआडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रूक्मिणी विनोद ताटे, बाबु काळे, सत्वशीला बाबु काळे आणि सुभाष वाघमारे (सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) या चौघांविरोधात भारतीय दंड विधान कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.