न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२२) :- शहरवासीयांना पावसाळ्यामध्ये पाणी तुबूंन कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने नालेसफाईचे कामकाज हाती घेतले जाते. त्यानुसार यंदाही नालेसफाईचे कामकाज येत्या दोन – तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.
पिंपरी – चिंचवड शहर परिसरात छोटे- मोठे मिळून १५२ नाले आहेत. पावसाळ्यापुर्वी नालेसफाई न केल्यास पाणी तुंबून नाल्याशेजारी रहिवाशी भागात पाणी शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जते. महापालिकेच्या आठही प्रभागात नाले आहेत. त्यामध्ये अ प्रभागात २५ व १३, क ३३, ड १२, इ २१, फ १५, ग ९ आणि ह प्रभागात २४ नाले आहेत.
याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, शहरातील नाल्यांच्या साफसफाईला येत्या दोन – तीन दिवसांत सुरुवात करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येणार आहे.
















