न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- ” तुमचे आमच्या चाळीत काय काम आहे ” असे म्हणल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण केली. एकावर कोयत्याने वार केला. रमाबाई कॉलनी येथे दुसऱ्यांची भांडणे सुरू असताना फिर्यादी हा त्याच्या आईला व बहिणीला घेऊन घरी जात होता.
दरम्यान, आरोपी हे फिर्यादी यांच्या चाळीत आले असता फिर्यादीची बहीण त्यांना म्हणाली. याप्रकरणी योगेश शरद निर्मल (रा. रमाबाई कॉलनी, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
सोनी धाटे, कान्हा धाटे, बाबा धोत्रे, अमोल कुसाळकर (सर्व रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.