न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२२) :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शहरातील एकवर आलेली कोरोना रुग्णांची संख्या आठवडाभरापासून वाढू लागली आहे. कोरोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी याबाबत बैठक घेऊन राज्या-राज्यांतील परिस्थिती जाणून घेतली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्तालयांतुन व्हिडिओ संसर्गाची माहिती घेतली. कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून बैठकीत मास्क वापरणे व कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्याविषयी पुन्हा जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. मास्क वापरणे, सतत हात धुणे, सामाजिक अंतर ठेवून सार्वजनिक जागी वावरणे यांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे गेलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क परिधान करणे गरजेचे आहे. लसीकरण न झालेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
– डॉ. अनिल रॉय (महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी)…












