- महावितरणकडून ग्राहकांना आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२२) :- बिलाची रक्कम न भरल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे, असा संदेश ग्राहकांना मिळत आहे. महावितरणकडून अशा प्रकारचे ‘ एसएमएस ‘ व ‘ व्हॉट्सअॅप मेसेज पाठविण्यात येत नाही. आर्थिक फसवणुकीची शक्यता असल्यामुळे या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकाना पुन्हा पाठविण्यात येत आहेत. याआधी गेल्या जानेवारी हा प्रकार घडला होता. मात्र, आता पुन्हा असे प्रकार घडत आहे. या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.












