- रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची धारदार शस्त्राने तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२२) :- पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांनी त्यांची वाहने नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. रात्री एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वाहनाची तोडफोड केली.
या घटनेत आय टेन (एमएच १४ सीएस ०६५५) आणि अल्टो Alto (एमएच १४ बीआर ०३७१) या वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. आरोपींनी दारुच्या नशेत गाड्यांची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.
सूर्यभान दगडू चोथवे (वय ४० रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.












