न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२२) :- महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेत (पीजीआय) मायक्रो बायोलॉजी (एमडी) हा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास ५ लाख रुपये शुल्क भरण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता ३ आहे. मायक्रो बायोलॉजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव वायसीएमने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास दिला होता. प्रस्ताव छाननी शुल्क ५ लाख रूपये आहे. ते शुल्क वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन या नावाने अदा करावे, असे पत्र २५ फेब्रुवारीला वायसीएमला मिळाले आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव पदव्युत्तर संस्थेने आयुक्तांसमोर ठेवला होता. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे.


















