न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी फजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची गुरुवारी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत भेट घेतली. त्यावेळी फजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शिवाजीराव गर्जे, संजोग वाघेरे-पाटील, राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
















