न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे, रेड झोन, रिंग रोड, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांकडे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी, पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयास सोमवार (दि. ११) रोजी दुपारी ३.०० वाजता मानवी साखळीव्दारे सर्व पक्षीय व सामाजिक संस्थाच्या वतीने हातात गाजर घेराव घालण्यात येणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच विविध सामाजिक संस्थाच्या वतीने आज शुक्रवार (दि. ८) रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.











