न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रु.) :- आगामी काळ निवडणुकीचा असल्याने भाजपकडून स्थायी समिती सदस्य निवडताना गटा-तटाचा समतोल कसा साधला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची २८ फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. २० फेब्रुवारीच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.
गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपणार आहे.











