न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन रविवार, दि. १ मे २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापालिकेचे प्रशासक राजेश प्रभाकर पाटील यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजारोहण होणार आहे.
रविवार, दि. १ मे २०२२ रोजी सकाळी ६.४५ वाजता सर्व क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कार्यालये आणि महापालिका शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अभिजीत हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, रविकिरण घोडके आणि विजयकुमार थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
तसेच महापालिकेच्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयामधील ध्वजारोहण संबंधित मुख्याध्यापक यांच्या हस्ते होईल. महापालिकेच्या विभागीय कार्यालय येथील ध्वजारोहण संबंधित शाखाप्रमुख यांच्या हस्ते होणार आहे.
















