न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२२) :- प्रभाग क्रमांक ३ मधील काटे वस्ती कॉलनी क्रमांक ४ येथे महानगरपालिकेमार्फत आज (दि. २९) रोजी एकूण २३ अनधिकृत नळजोड बंद केले आणि मनपाचे थेट नळाला लावलेल्या एकूण १८ विद्युत मोटर्स जप्त केल्या.
कारवाई ही १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता, १ मीटर निरिक्षक, ४ राज्य राखीव सुरक्षा बल यांचे कर्मचारी, २ मनपाचे फिटर, ६ मजूर, २ वायरमन, अतिक्रमण गाडी चालकासह १ अशा एकूण १८ जणांच्या पथकाने केली.
ही कारवाई इ प्रभागाचे उपअभियंता सुदर्शन वहीकर, कनिष्ठ अभियंता विनय जगताप, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.