न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२२) :- महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत बो-हाडेवाडी, इलेक्ट्रॉनिक सदन लांडेवाडी येथील १८ टपऱ्या, ३७ पत्राशेडवर आज (दि. २९) रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली व बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, साधना ठोंबरे इ. सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.