न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रु.) :- राजकीयदृष्ट्या गरमागरमी असलेल्या नवी दिल्लीमध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी एचए कामगार संघटनेचे पदाधिकारी अरुण बोऱ्हाडे आणि प्रविण मोरे तीन दिवस तळ ठेऊन होते.
यासंदर्भात महत्त्वाच्या बैठका घेऊन, चर्चा करण्यात आली. रसायनमंत्री सदानंद गौडा, रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया आणि रसायन मंत्रालयातील औषधनिर्माण विभागाचे संयुक्त सचिव (JS, Pharma), रजनीश टिंगल यांच्याशी स्वतंत्रपणे बैठका घेऊन चर्चा केली.
एच. ए. च्या कामगारांचे गेले वीस महिन्यांपासून पगार थकले आहेत. केंद्रीय रसायन मंत्रालयाने कामगारांचे थकित पगार, व्ही. आर. एस. व इतर निधी देण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास लवकरच केबिनेटची मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे रसायन मंत्री गौडा यांनी आश्वासन दिले. या प्रस्तावामूळे कामगारांना दिलासा मिळेल.
तत्पूर्वी तातडीने पाच कोटींची याच आठवड्यात तजवीज होईल, असे जॉईंट सेक्रेटरी रजनीश टिंगल यांनी सांगितले. यासंदर्भात माजी कृषीमंत्री शरद पवार यांचीही दिल्लीत भेट घेतली. तेही या प्रस्तावाच्या मान्यतेबाबत संबंधितांशी बोलणार आहेत, असे कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले आहे.











