न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ९ फेब्रु.) :- चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचलित श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात अनोख्या सायन्स सेंटर चे उद्धाटन झाले. विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे, डोळे उघडून मेंदू वापरून सर्वाना बघता आले पाहिजे. विज्ञान जगणे म्हणजे खरे विज्ञान शिकणे होय आणि शुशिक्षित दांभिकांना जिथल्या तिथे रोखणे होय, या उक्तीप्रमाणे आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. आपण २१ व्या शतकात प्रवेश करत, असताना विज्ञानाचे महत्व ओळखून विद्यार्थी पुढे जाऊन या स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हायचा असेल, तर गणित विज्ञान या विषयात पारंगत असला पाहिजे हे ओळखून विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांच्या संकल्पनेतून या सायन्स सेंटरची निर्मिती करण्यात आली.
पुण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक सज्जनकुमार तुलस्यान यांच्या शुभहस्ते शुक्रवार (दि. ८) रोजी विद्यालयात या अनोख्या सायन्स सेंटरचे उद्घाटन झाले. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, पुजानृत्य, भारुड, रोप मल्लखांब, लेझीम इ. कार्यक्रम सादर करून पाहुण्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमात बोलतांना तुलस्यान म्हणाले की, “ मी अनेक शाळा पहिल्या परंतु, या शाळेतील कार्यक्रम आणि उपक्रम हे कोठेही पहिले नाहीत. या शाळेतील शिस्त, स्वच्छता, आणि गुणवत्ता पाहून आपण गदगद झालो आहोत”, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “ या शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव ज्यांनी आपले संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले. हेच तुमचे मोठे आदर्श आहे, “ असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले. विद्यार्थ्यांनी विज्ञान युगाची जरूर कास धरावी परंतु, आपल्या आई, वडील आणि शिक्षकांनी केलेले संस्कार कधीही विसरू नये” असा सल्लाही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुण्यांनी शाळेतील गणित प्रयोगशाळा, इंग्रजी प्रयोगशाळा, भूगोल प्रयोगशाळा, संगणक, तसेच विज्ञान प्रयोगशाळा यांची पाहणी केली. पाहुण्याचे स्वागत संस्थेचे उप अध्यक्ष जगदिश जाधव, संचालक अमित बच्छाव, विजय जाधव यांनी केले. याप्रसंगी पालक संघाचे प्रतिनिधी हर्षदा दुर्गुडे, विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, उप मुख्याध्यापक किसन आहिरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय भालेराव, ज्योती क्षीरसागर यांनी तर, प्रास्ताविक पर्यवेक्षक अनिल कर्पे, तर आभार प्रदर्शन शब्बीर मोमीन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश ढवळे, अजिनाथ गुराळकर, भाऊसाहेब पगार, कविता जगताप, सुचित्रा झेंडे, मनीषा चिखले, संध्या दरंदले, मुबारक मोमीन, नलिनी चौधरी, शरद पटेल, श्री वेलू एस. आर, प्रतिभा साबळे, निशा शिंदे, दिलीप इथापे या शिक्षकांनी तर ज्ञानेश्वर वर्पे, रमेश जाधव नंदा उद्गीरकर, लता गायकवाड, छाया शिंदे या शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.











