न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- उड्डाणपुलावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास नाशिक फाटा, भोसरी येथे घडली. शुभम विजय कांबळे (वय २७, रा. सम्राटनगर, पिंपळे सौदागर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास शुभम हा त्याच्या दुचाकीवरून नाशिकफाटा येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलावर आला. तेथून त्याने खाली पुणे – मुंबई महामार्गावर उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.