न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- गावाकडून कमी दरात बासमती तांदूळ व बटाटा खरेदी करून त्याची शहरात विक्री केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष फिर्यादीस दाखविले त्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला फिर्यादीकडून आरोपींनी नऊ लाख ३० हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीस चिकन सेंटर सुरू करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २० हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपीच्या खात्यावर १५ लाख ३० हजार रुपये घेतले.
अशाप्रकारे आरोपी फिर्यादी यांची २४ लाख ८० हजार रुपये घेऊन पळून गेले. दोन्ही आरोपी भाऊ हे फिर्यादीच्या गावाकडील आहेत. हा प्रकार २०१९ ते ४ मे २०२२ या कालावधीमध्ये काळेवाडी येथे घडला.
सुमित अनिल विश्वास (वय ३६, रा. पंचनाथ चौकाजवळ, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहमद साबिरअली शेख आणि त्याचा भाऊ सरफराज शेख (दोघेही रा. पश्चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.