न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचे कुलूप लोखंडी टॉमीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरी करून परत जाताना चोरट्याने प्रेस लॉकचे तोडलेले ते कुलूप पुन्हा घराला लावले. हा प्रकार दिघी येथे ३ मे रोजी घडला. महिलेने बुधवारी (दि. ४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहे.
















