न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १५ कर्मचाऱ्यांची उपलेखापाल पदावरील पदोन्नती नियमित करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश सहाय्यक आयुक्त (प्रशासन) बाळासाहेब खांडेकर यांनी काढले आहेत.
संजय काळभोर, मोरेश्वर ठोंबरे, विजयकुमार कोंडे, विवेक शिर्के, संजीव कारकुड, हेमंत सोनावले, दत्तात्रय आचारी, राजश्री नेवासकर, किरण शिवरात्री, शुभांगी साळी, शालन टिळेकर, अंकुश कदम, संजय कांबळे, अभिजित भागवत, अविनाश ढमाले आदी कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. \
सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुज्ञा याचिकेच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात प्राप्त होणाऱ्या शासन मार्गदर्शनाच्या अधीन राहून प्रथमतः वर्षभराच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात उपलेखापाल या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यांना ३८६००-१२२८०० या वेतनश्रेणीत पदोन्नती दिली आहे. त्यांचा परिविक्षाधीन कालावधी १४ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आला. त्यांचे कामकाज, हजेरी आणि वर्तणूक समाधानकारक असल्याचा अहवाल विभागप्रमुखांकडून प्राप्त झाल्याने त्यांची पदोन्नती नियमित करण्यात आली आहे.