- तरुणाला अटक; महिलेवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- पोलिसाची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मोबाईल हिसकावल्याबाबत पोलिस विचारपूस करीत असल्याचा राग मनात धरून पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की करण्यात आली.
हा प्रकार निगडी येथे घडला. अमर काळूराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ते निगडी पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. नरेश ऊर्फ प्रांजल सुनील घटवट (वय २७, रा. ओटास्कीम, निगडी) याला निगडी पोलिसांनी अटक केली असून, एका पन्नास वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.