न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- ट्रक आणि ट्रेलर यांच्यात धडक होऊन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चालकाचे अंडा पॉइंट परिसरात आल्यावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे.
ट्रेलरने टेम्पोला धडक दिली होती. त्यामध्ये दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहेत.