न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- भोसरीतील गेल्या अनेक वर्षांपासून राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी भाजीपाला-फळ विक्रेते व्यवसाय करतात. महापालिकेसमोर यांच्या स्थलांतराचा प्रश्न होता.
या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा विचार करून महापालिका प्रशासनाने राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण अंतर्गत बांधण्यात आलेल्या १५० कट्ट्यांवर परवानाधारक १०० ते १५० भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यावसायिकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीतील संत ज्ञानेश्वर भाजी मंडई बांधून तयार आहे. मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीकरिता भाजीपाला व फळ विक्रेत्यांचे स्थलांतर झाले नव्हते.