न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- १६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले. तिच्यासोबत असलेल्या पुरुषांपैकी दोन पुरुषांनी त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करून त्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला.
यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणात लाल महालाचे रखवालदार सोनवणे यांनी फिर्याद दिली. यावर बोलताना सोनवणे म्हणाले, मी त्यांना लावणी नृत्य व त्याचे शुटींग करण्यापासून रोखले होते. पण त्यांनी ते ऐकले नाही.
या प्रकरणी आता फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राकेश विनोद सोनवणे यांनी फिर्याद दिली होती. या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.