न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२२) :- चिचवडगाव येथील महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेची येत्या आठवडाभरात चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या बेसमेंटमधील प्रवेशद्वाराच्या बाजूलाच शनिवारी (दि २१) दुपारी सव्वाचारच्या सुमारास आग लागली होती. चिंचवड भागात सकाळपासून वीज नसल्याने जनरेटरवर सकाळी १० पासून रुग्णालयाचा वीजपुरवठा सुरू होता. जनरेटर सुरू असल्याने बॅटऱ्या तापल्या होत्या. त्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या थेरगाव, प्राधिकरण आणि रहाटणी केंद्राच्या पाच बंबांनी घटनास्थळी दाखल होत काही वेळातच ही आग विझविण्यात यश मिळविले होते.