न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२२) :- अज्ञात व्यक्तीने फिर्यादीस फोन करून तो एमएसईबी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. ” तुमचे लाईटबील तुम्ही भरले नाही. ते मला सिस्टीममध्ये दिसत नाही. तुम्ही जर लाईटबील भरले नाही, तर आम्ही तुमची लाईट लगेच कट करू ” असे फिर्यादी यांना आरोपीने सांगितले.
फिर्यादी घाबरले आणि ” तुम्ही आमची लाईट कट करू नका, मी लाईटबील ऑनलाईन भरून घेतो” असे आरोपीला सांगितले. त्यावर आरोपीने फिर्यादी यांना MHEVITARAN आणि ANY DESK REMOTE DESKTOP SOFTWARE हे अॅप इंन्स्टॉल करायला लावले. त्यानंतर फिर्यादी यांच्या दोन बँक खात्यावरील एकूण चार लाख तीन हजार ९९२ रुपये कट झाले.
हा प्रकार सोमवारी (दि. २३ मे) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान पिंपळे सौदागर येथे घडला. प्रजेस सुरेश संकपाळ (वय ४५, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत