न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२२) :- ” ग ” क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थेरगाव परिसरातील प्रभाग क्र. २३ दगडू पाटीलनगर येथे आज (दि. २५) पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
या कारवाईमध्ये ६ आर.सी.सी. बांधकामे व ५ पत्राशेड निष्कासित करण्यात आले. या बांधकामाचे अंदाचे क्षेत्रफळ १७०८६.०० चौ.फु. आहे.
या कारवाईसाठी २ उपभियांता, १ कनिष्ठ अभियंता, ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) तसेच मनपा पोलीस २०, . कारवाईस ३ जेसीबी, ५ मजूर, १ ब्रेकर, वाकड पोलीस स्टेशन कडील सहायक पोलीस निरीक्षक १, इतर पोलीस कर्मचारी ९, तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे १९ सुरक्षा रक्षक, अग्रिशामक विभागाचे अग्रिशामक दल, आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.