न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- १४ वर्षीय मुलीचा बालविवाह उरकण्याची आरोपींनी तयारी केली होती. त्यासाठी आरोपींनी घरासमोर मंडप टाकला. ही घटना बुधवारी (दि. २५) सकाळी बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.
३० वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास मोहन पवार (वय २३), प्रकाश मोहन पवार (वय ४८), पुष्पा दिनेश मोरे (वय ३५), दीपा मारुती कहाडे (वय ४५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















