न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किरणराज यादव यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी दिले आहेत.
महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांच्याकडे यादव यांनी सोमवारी पदभार स्वीकारला होता. शहराचा स्मार्ट सिटीत तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला.
३० डिसेंबर २०१६ रोजी शहराची स्मार्ट सिटीत निवड झाली. पाच वर्षात स्मार्ट सिटीतील एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. देशभरात स्मार्ट सिटी कंपन्यांचा गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ एप्रिलपासून कोणतीही निविदा प्रक्रिया राबवू नये, असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने सर्व स्मार्ट सिटी कंपन्यांना दिले आहेत.