- एका वृद्धासह तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२२) :- पीडित मुलीला सोमवारी (दि. ३० ) सायंकाळी चारच्या सुमारास आरोपीनी जबरदस्तीने रस्त्यालगतच्या मातीच्या ढिगाऱ्यााच्या आडोशाला नेले. तेथे आरोपीने मुलीला पकडले तर एकाने तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार निगडीतील चिकन चौक येथे घडला. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. राजेश शिवमूर्ती सरवदे (वय ६५, रा. चिकन चौक ओटास्कीम, निगडी), काळुराम बाबू पवार (वय २८, रा. राजनगर, ओटास्कीम निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.