न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२२) :- घरी असताना फिर्यादीचा मुलगा हा दारुच्या नशेत घरी आला. घरगुती भांडणाच्या कारणावरून आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. फिर्यादी या दरवाजा बंद करीत असताना त्यांचा डावा हात दरवाजात सापडला.
तरीही जबरदस्तीने दरवाजा बंद केल्याने फिर्यादी यांच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन एक बोट तुटले. ही घटना ताथवडे येथे सोमवारी घडली. आई शकुंतला धोंडे यांनी फिर्याद दिली आहे. तुषार शिवाजी धोंडे (वय ३०, रा. श्रीराम आरंभ सोसायटी, ताथवडे) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.