न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२२) :- धावडेवस्ती येथे फिर्यादी यांचे स्टोअर्स दुकान आहे. ते रात्री त्यांच्या दुकानात असताना आरोपी तिथे आला. त्याने काहीही कारण नसताना फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली.
फिर्यादीला जखमी करून दुकानाच्या गल्ल्यातून सात हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. २९ मे) रात्री दहा वाजता भोसरी येथे घडला.
चंद्रकांत शंकर पवार (वय ३९, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत गायकवाड (रा. धावडेवस्ती, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.