न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२२) :- दापोडीतील गुलाबनगर येथे आरोपी मालकीच्या शेडमध्ये तीनपत्ती हा जुगार अड्डा चालवत होता. भोसरी तपास पथकातील पोलीस अधिकारी मुकेश मोहरे यांना माहिती मिळाली.
त्यांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी तीन लाख ४१ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ताज उर्फ इम्तियाज इस्लाम शेख (वय २६, रा. गुलाबनगर, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.