- नोकरीसाठी तरुणाची अडीच लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०२२) :- आमच्या कंपनीत नोकरीसाठी निवड झाल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. एका पदासाठी अनेक उमेदवार आले आहेत. जर त्यातून तुमची निवड फिक्स करायची असेल तर त्यासाठी आमची फी द्यावी लागेल.
तसेच कंपनीचे शेअर्स घ्यावे लागतील, वर्क फ्रॉम होमसाठी लागणारे लॅपटॉप घ्यावे लागतील व कुरिअर करण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांची दोन लाख ४० हजारांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेले पैसे त्यांना परत न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.
उपेंद्र शिरीष कुलकर्णी (रा. पांढरे वस्ती, पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज सिचना, एच आर डिपार्टमेंट, सेलोनिसे टेक्नॉलॉजिस कंपनी, बंगलोर व अभिदीप दासगुप्ता मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















