- पिंपरीत तिघांकडून खंडणीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०२२) :- ‘ तुला धंदा करायचा असेल तर दर आठवड्याला मला पैसे द्यावे लागतील, नाही तर तुला धंदा करून देणार नाही, ‘ अशी धमकी देत फिर्यादीकडून दोनशे रुपये घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा हप्ता म्हणून पैसे मागितले असता फिर्यादी यांनी पैसे दिले नाहीत.
त्यानंतर आरोपींनी हत्यार दाखवून धंदा करून देणार नाही, अशी धमकी दिली. फिर्यादी यांचे भाजी मंडईत दुकान आहे. याप्रकरणी जानेसार जमशाद शेख (रा. भीमनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















