न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२२) :- १५ वर्षीय मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी जवळीक साधली. आपण लग्न करणार आहोत, तू माझी बायको आहे, असे बोलून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिला मुलगा झाला. मात्र, मुलाचा मृत्यू झाला.
ही घटना काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पवन ऊर्फ गुरू कैलास ओव्हाळ (वय १९, मधुबन कॉलनी, थेरगाव, मूळ-बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सध्या दुसऱ्या गुन्ह्यात कारागृहात आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.