न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२२) :- कंपनीची डिलरशिप व प्रॉडक्ट देतो, कमिशन मिळवून देतो, असे आमिष दाखवून डिलरशिपसाठी तीस हजार व स्टॉक घेण्यासाठी १५ हजार असे ४५ हजार रुपये ऑनलाइन घेतले. मात्र, स्टॉक न देता फसवणूक केली.
याप्रकरणी आनंदकुमार लक्ष्मण मसणे (वय ५२, रा. किर्तीनगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक तिवारी, अमित पवार, आशिष पवार (रा. उरुळी देवाची) व नीतू जैन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.