न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- इंद्रायणीनगर भाजी मंडईमधील भाजी मंडईच्या एकुण ९० गाळ्यांच्या वितरणासाठी पालिकेने जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ९० गाळ्यांसाठी सोडत काढणेत आली आहे.
ज्या गाळेधारकांना सोडतीमध्ये गाळे मंजुर झाले आहेत, त्यांना सर्व मनपा कराव्यतिरिक्त निव्वळ मासिक भाडे र.रु. १,७११ याप्रमाणे सहा महिन्याचे आगाऊ भाडे र.रु. १०,२६६ भरून भाडेकरारनामा करून देण्यास कळविणेत आले आहे.
अद्याप ९० गाळेधारकांपैकी ३४ गाळेधारकांनी आगाऊ भाडे रक्कम भरलेली नाही व ज्या ५६ गाळेधारकांनी रक्कम भरलेली आहे त्यांनी भाडेकरारनामा करून दिलेला नाही. ज्या गाळेधारकांनी रक्कम भरलेली आहे त्यांनी त्वरित भाडेकरारनामा करून द्यावा आणि ज्यांनी रक्कम भरलेली नाही त्यांनी तातडीने रक्कम भरून भाडेकरारनामा करून द्यावा.
याबाबतची पुर्तता (दि. १०) पुर्वी करणेत यावी. अन्यथा, सोडतीमध्ये निश्चित करणेत आलेले गाळे आवश्यक नाहीत, असे समजुन रद्द करणेत येतील,असे पालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.
















