- पिंपळे सौदागरमधील घटना; २६ वर्षीय तरुणाकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- बनावट अॅप्लिकेशन तयार करून आरोपींनी त्याआधारे फिर्यादी यांना तीन हजार ८५० रुपये ऑनलाइन पाठवले नसतानाही पाठवले असल्याचे सांगत त्यांच्याकडे सात हजारांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीनी शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या फोटोचा वापर करून त्यावर इंग्रजीत अश्लील मजकूर लिहिला. पॅनकार्ड व ओळखपत्राचा वापर करीत अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हिडिओ फिर्यादीच्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवला.
तसेच इतर नातेवाइकांना पाठवण्याची धमकी दिली. पिंपळे सौदागर येथील २६ वर्षीय तरुणाने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारा मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
















